पुणे शहरात २६६ नवीन कोरोनाबाधित

गेल्या तीन चार दिवसानंतर संशयित रुग्णांची चाचणी पुन्हा वाढली असुन, ९ हजार ६०४ जणांची चाचणी केली गेली. सध्या शहरांत २ हजार ५६ सक्रीय रुग्ण असुन, त्यापैकी २०२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

    पुणे : गेल्या चाेवीस तासांत शहरांत काेराेना बाधित २६६ नवीन रुग्ण आढळून आले. तर २१५ रुग्ण काेराेनामुक्त झाले. शहरातील पाच जणांसह १३ रुग्णांचा मृत्यू झाला.

    गेल्या तीन चार दिवसानंतर संशयित रुग्णांची चाचणी पुन्हा वाढली असुन, ९ हजार ६०४ जणांची चाचणी केली गेली. सध्या शहरांत २ हजार ५६ सक्रीय रुग्ण असुन, त्यापैकी २०२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत ४ लाख ९१ हजार ८ जणांना काेराेनाची लागण झाली, त्यापैकी ४ लाख ८० हजार ८९ जणांनी काेराेनावर मात केली. ८ हजार ८६३ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.