कोरोनाचा वाढता कहर
कोरोनाचा वाढता कहर

बारामती तालुक्यात आणि शहरात आज रविवारी २८ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची(28 new corona patients) नोंद करण्यात आली आहे. तसेच बारामती शहरांतील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बारामती : बारामतीमध्ये (Baramati) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. बारामती तालुक्यात आणि शहरात आज रविवारी २८ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची(28 new corona patients)  नोंद करण्यात आली आहे. तसेच बारामती शहरांतील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील मृत्यूची (Deaths) संख्या ३३ इतकी झाली आहे.

बारामतीमध्ये काल शनिवारी एकूण १८६ जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते. परंतु त्यापैकी १३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. बारामती शहरात १७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ग्रामीण भागातील ११ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण संख्या २८ झाली आहे. मात्र, बारामतीमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७७६ वर पोहचला आहे.