पुण्यात गेल्या चोवीस तासांत २८६ कोरोना बाधित ; २८५ रुग्णांना डिस्चार्ज

२८५ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४ लाख ७८ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ लाख ६७ हजार ५०५ रुग्ण बरे झाले तर ८ हजार ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत ६ हजार ४८४ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

    पुणे : शहरात गेल्या चोवीस तासांत २८६ कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळले अाहे. तर २८५ रुग्ण हे काेराेनामुक्त झाले आहे. तर पुण्यातील सहा जणांसह १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या २ हजार ७०४ ऍक्टीव्ह रुग्ण असून त्यापैकी २८५ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४ लाख ७८ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ लाख ६७ हजार ५०५ रुग्ण बरे झाले तर ८ हजार ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत ६ हजार ४८४ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.