मलठणला ३ दिवस पूर्ण लॉकडाऊन; सरपंच प्रकाश गायकवाड यांची माहिती

कवठे येमाई : सध्य स्थितीत अनेक ठिकाणी कोरोनाचे संक्रमण अतिशय वेगाने होत असल्याने दक्षता म्हणून आज मंगळवार दि. १२ ते गुरुवार दि.१४ पर्यंत शिरूर तालुक्यातील मलठण गाव पूर्ण लॉक डाऊन राहणार असल्याचे सरपंच प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

 कवठे येमाई : सध्य स्थितीत अनेक ठिकाणी कोरोनाचे संक्रमण अतिशय वेगाने होत असल्याने दक्षता म्हणून आज मंगळवार दि. १२ ते गुरुवार दि.१४ पर्यंत शिरूर तालुक्यातील मलठण गाव पूर्ण लॉक डाऊन राहणार असल्याचे सरपंच प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. तर आज असणारा बाजार ही रद्द झाला असून पुढील २ दिवस दूध व मेडिकल या अत्यावश्यक सेवाच ठराविक वेळेत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३ दिवस मलठण गाव लॉक डाऊन राहणार असल्याने कुणीही गावात भाजीपाला व इतर वस्तु हि विक्रीस अजिबात आणू नये. तसेच कुणीही घराबाहेर पड़ नये. घरातच थांबावे,विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास त्यांचा फोटो काडून त्यांच्यावर  कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ही गायकवाड यांनी सांगितले.