मूर्ती लहान कीर्ती महान! सुईच्या वापराने साकारली अवघ्या ३ मिमीची विठ्ठलाची मूर्ती

पुणे (Pune) आणि अहमदनगर (Ahmednagar) येथील लघुमूर्तिकार (मिनिएचर आर्टिस्ट) लिखाराम जांगिड यांनी लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करत आपले नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदवले आहे. ह्या काळात त्यांनी बनवलेल्या कलाकृतींमध्ये ३x१ मिलीमीटर आकाराची विठ्ठलाची मूर्ती, १ मिलीमीटर आकाराचे कमळाचे फूल, शिवलिंग, मानवी मूर्ती आणि अवघ्या तळहातावर बसेल अश्या ४० प्रकारच्या विविध कलाकृतींचा समावेश आहे.

पुणे: पुणे (Pune) आणि अहमदनगर (Ahmednagar) येथील लघुमूर्तिकार (मिनिएचर आर्टिस्ट) लिखाराम जांगिड ( Likharam Jangid) यांनी लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करत आपले नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदवले आहे. ह्या काळात त्यांनी बनवलेल्या कलाकृतींमध्ये ३x१ मिलीमीटर आकाराची विठ्ठलाची मूर्ती, १ मिलीमीटर आकाराचे कमळाचे फूल, शिवलिंग, मानवी मूर्ती आणि अवघ्या तळहातावर बसेल अश्या ४० प्रकारच्या विविध कलाकृतींचा समावेश आहे. विठ्ठल देवाची मूर्ती बनवण्यासाठी सुईच्या वापराने लाकडी कोरीव काम केले गेले आहे. ही शिल्पकला इतकी लहान आहे की ती तीन मायक्रोस्कोप कॉन्व्हेक्स लेन्सच्या सहाय्याने तयार केली गेली आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प झाली आणि लीखाराम व त्यांच्या साथीदारांना राजस्थानच्या मूळ गावी परतावे लागले. तेथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या कुशल हातांनी १४-दिवसांच्या क्वारंटाईन काळात स्टेनलेस स्टील, पितळ आणि लाकूड वापरून ४० हून अधिक साधने बनविली. ही सर्व साधने हाताच्या पंजेवर ठेवता येतात, ती इतकी लहान असूनही वापरण्यायोग्य आहेत.

लीखाराम यांचे आजोबा आणि वडीलसुद्धा कुशल कारागीर होते. लिखाराम लहानपणापासूनच चित्रकला आणि शिल्पकलेमध्ये तज्ज्ञ होते. १९९७ मध्ये ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यशस्वी झाले मात्र बिकट परिस्थितीमुळे त्यांना बारावीनंतर शाळा सोडावी लागली आणि ते महाराष्ट्रात स्थायिक झाले. प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांच्याकडून लखन यांनी चित्रकार आणि शिल्पकला याचे बरेच धडे घेतले आहे.