मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी ५ वर्षाकरिता ३० लाखाचा खर्च ;एमएनजीएलसोबत पालिका करणार करार

नेहरूनगर येथील या दहन मशिनमध्ये पाळीव प्राण्यांचे दहन करण्यासाठी अंदाजे एक हजार युनिट गॅसची आवश्यकता असते. त्यापोटी दरमहा अंदाजे ५० हजार रूपये इतकी रक्कम एमएनजीएलला देण्यात येते. त्यामुळे या गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी एमएनजीएल समवेत पाच वर्षासाठी करारनामा करून पुरवठा आदेश देणे गरजेचे आहे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर यासारख्या छोट्या पाळीव प्राण्यांचा मृत्यु झाल्यास नेहरूनगर येथील दहनभुमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येतो. येथील दहन मशिनला गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्यासमवेत पाच वर्षासाठी करारनामा करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० लाख रूपये खर्च होणार आहे.

    महापालिका हद्दीत कुत्रा, मांजर यासारख्या छोट्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास अशा मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी – नेहरुनगर येथे २००७ मध्ये छोटे प्राणी दफन भुमी कार्यान्वित करण्यात आली होती. त्यानंतर याठिकाणी दहन मशिनही बसविण्यात आली. या मशिनसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत सीएनजी गॅस पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी ३ जानेवारी २०१५ रोजी पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्पेâ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यासमवेत पाच वर्षे कालावधीसाठी करारनामा करण्यात आला होता. या करारनाम्याची मुदत २ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे गॅस पुरवठा कार्यान्वित ठेवण्यासाठी नव्याने करारनामा करणे आवश्यक आहे.

    नेहरूनगर येथील या दहन मशिनमध्ये पाळीव प्राण्यांचे दहन करण्यासाठी अंदाजे एक हजार युनिट गॅसची आवश्यकता असते. त्यापोटी दरमहा अंदाजे ५० हजार रूपये इतकी रक्कम एमएनजीएलला देण्यात येते. त्यामुळे या गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी एमएनजीएल समवेत पाच वर्षासाठी करारनामा करून पुरवठा आदेश देणे गरजेचे आहे. या करारनाम्याचा कालावधी ३ डिसेंबर २०२० ते २ डिसेंबर २०१५ या कालावधीपर्यंत राहील. त्यासाठी ३० लाख रूपये खर्च होणार आहे. त्यानुसार, एमएनजीएल यांच्यासमवेत पाच वर्षे कालावधीसाठी करारनामा करण्यात येणार आहे.