पवना धरणात अवघा ३०.५९ टक्के पाणीसाठा

    पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणात यंदा आज अखेर ३०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजअखेर ३४.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी धरणात ४ टक्के साठा कमी शिल्लक आहे.

    गेल्या वर्षी चांगाला पाऊस झाल्याने ४ सप्टेंबरलाच धरण १०० टक्के भरले होते. यावर्षी १ जूनपर्यंत ६९ मिमी एवढा पाऊस झाला आहे, तर गतवर्षी आजच्या तारखेला ११७ मिमी एवढा पाऊस झाला होता, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अन्वर तांबोळी म्हणाले, धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा.