थंब इम्प्रेशन बंद च्या मागणीसाठी ३०० रेशनदुकानदार संपावर ; वादावादीचे प्रकार घडत असल्याने दुकानदार त्रस्त

'थंब' मुळे धान्य देता येत नाही. थंब नसल्याने मोफत धान्य देता येत नाही. त्यामुळे वादावादीचे प्रकार होत आहेत. त्याला वैतागुन महाराष्ट्रातील ५२ हजार रेशनदुकांदार गेले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. पण, त्याची दखल घेतली जात नाही. धोका पत्करुन रेशनदुकानदार काम करत असताना सुरक्षेची कोणतीही हमी दिली जात नाही.

    पिंपरी: कोरोनाचा प्रसार वाढत असून गोरगरिबांना धान्य वितरण करताना रेशन दुकानदारांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे थंब मशीन बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी पिंपरी – चिंचवड शहरातील ३०० रेशनदुकानदार संपावर गेल्याने धान्य वितरण केले जाणार नसल्याची माहिती ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी दिली.

    कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे. अशा संकटाच्या काळातही रेशन दुकानदार आपली सेवा देत आहेत. गरिबांना धान्य पुरविण्याची जबाबदारी रेशन धान्य दुकानदारांवरच आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाची ही योजना रेशन धान्य दुकानदारांच्या माध्यमातूनच गरिबांपर्यंत पोहोचते. अत्यावश्यक सेवेत कार्य करूनही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत रेशनदुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

    केंद्र, राज्य सरकार गोरगरिबांना मोफत धान्य देण्याच्या घोषणा करते. पण, ‘थंब’ मुळे धान्य देता येत नाही. थंब नसल्याने मोफत धान्य देता येत नाही. त्यामुळे वादावादीचे प्रकार होत आहेत. त्याला वैतागुन महाराष्ट्रातील ५२ हजार रेशनदुकांदार गेले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. पण, त्याची दखल घेतली जात नाही. धोका पत्करुन रेशनदुकानदार काम करत असताना सुरक्षेची कोणतीही हमी दिली जात नाही. धान्य घ्यायला कोण कोठून आला याचा विचार न करता धान्य दिले जाते. आतात तर कामगारांचाही तुटवडा आहे. अनेकांचे थंब नाही, नोंदणी नाही. त्यामुळे थंब न करता माल देण्याची परवानगी द्यावी. थंबमधून सवलत द्यावी. जेणेकरून गोरगरिबांना धान्य देता येईल, अशी रेशनदुकानदारांची मागणी आहे. पण, सरकारकडून मान्यता दिली जात नाही. पिंपरी – चिंचवड शहरात रेशनची ३०० दुकाने आहेत. हे दुकानदार मे महिन्याचे धान्य उचलणार नाहीत.

    ” रेशन दुकानदारांच्या माध्यमातूनच गरिबांपर्यंत धान्य पोहोचते. थंबमुळे सर्वांना सरसकट धान्य देता येत नाही, अडचणी येतात. त्यामुळे थंब इम्प्रेशन बंद करण्यासह विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. आमची संपावर जाण्याची इच्छा नाही. पण, आमच्या मागण्यांचा सरकार विचार करत नाही. त्यामुळे आमच्यावर संपाचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे ”.- विजय गुप्ता (खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन)