पुण्यात ३१८ नवीन कोरोनाबाधित  रुग्ण

दिवसभरात १० जणांचा मृत्यू पुणे : शहरात गुरुवारी ३१८ कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून आले. दहा जणांचा मृत्यू झाला असून, कोरोना मुक्त झालेल्या २०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे

दिवसभरात १० जणांचा मृत्यू 


पुणे : शहरात गुरुवारी ३१८ कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून आले. दहा जणांचा मृत्यू झाला असून, कोरोना मुक्त झालेल्या २०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ६८७९ झाली असली तरी ३६६१ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली.आजपर्यंत जिल्ह्यात अॅक्टीव्‍ह  रुग्ण संख्या २९१२ असून  , एकूण ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तसेच १८० रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्‍याचेही  त्‍यांनी सांगितले. 

पुणे शहरात बुधवारी कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या घटली होती. गुरुवारी मात्र ही संख्या तीनशेहून अधिक पुढे गेल्याने सर्वांची चिंता कायम राहिली आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या सहा हजाराच्या जवळ पोचली आहे. गुरुवारपर्यंत हा.आकडा ५ हजार ८५१ पर्यंत पोचला आहे. मरण पावलेल्यांची संख्या २९१ झाली असून, कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ३ हजार २६४ इतकी आहे. कोरोनावर मात करणार्यांचे प्रमाण पन्नास टक्क्याहुन अधिक आहे. गुरुवारी सुमारे तेराशे स्वैब नमुने घेतले असून आजपर्यंत सुमारे ४६ हजार ५८२ स्वैब नमुने घेतले गेले आहे. गुरुवारी मरण पावलेल्या मध्ये प्रत्येक पाच पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. तसेच सहा ज्येष्ठ नागरिक आहेत.

विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ८५२१ झाली आहे.विभागातील  ४१९७ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  अॅक्टीव रुग्ण संख्या ३९४९आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १८७ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत  रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण ३९९ ने वाढ झाली आहे.  त्यामध्ये पुणे जिल्हयात २७५, सातारा जिल्हयात २८, सोलापूर जिल्ह्यात ४२ सांगली जिल्हयात १० तर कोल्हापूर जिल्हयात ४४ अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे