दुर्बिणीच्या मदतीने क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ३३ बुकींना अटक; ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

दुर्बिणीतून मॅचच्या प्रत्येक बॉलवर नजर ठेून सट्टा लावत होते. वाकड पोलिसांनी ७४मोबाईल, ३ लॅपटॉप, ८ कॅमेरे, दुर्बिणी, विदेशी नोटा, असा जवळपास ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पिंपरी: भारत विरुद्ध इंग्लड (India vs England) क्रिकेटच्या सामन्यावर घोरडेश्वराच्या टेकडीवर जाऊन दुर्बिणीतून प्रत्येक चेंडूवर नजर ठेऊन प्रत्येक मिनिटाला सट्टा लावणाऱ्या ३३ सट्टेबाज पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या बुकींकडून ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यामध्ये मोबाइल, लॅपटॉप, कॅमरे, दुर्बिणी, विदेशी नोटा जप्त केल्या आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोरडेश्वर टेकडीवरुन आठ बुकींना अटक केली आहे. हे आठजण दुर्बिणीतून मॅचच्या प्रत्येक बॉलवर नजर ठेून सट्टा लावत होते. वाकड पोलिसांनी ७४मोबाईल, ३ लॅपटॉप, ८ कॅमेरे, दुर्बिणी, विदेशी नोटा, असा जवळपास ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


    बेड्या ठोकण्यात आलेले ३३ बुकी हे महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील असून गहुंजे क्रिकेट मैदानाजवळच रहायला होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.