‘अभय’ अंर्तगत ३४१ काेटी मिळकत कर जमा ; यंदा नाेव्हेंबरअखेर १८४ काेटी रुपये अधिक जमा

पुणे : अभय याेजनेत साेमवारी सांयकाळपर्यंत महापालिकेकडे सुमारे ३४१ काेटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. या याेजनेचा सुमारे १ लाख १० हजार थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नाेव्हेंबरअखेर १८४ काेटी रुपये अधिक जमा झाले आहे.

महापालिकेच्या मिळकत कर आकारणी आणि संकलन विभागाने ही याेजना राबविली हाेती.ऑकटोबर ते नाेव्हेंबर या महीन्यात अभय याेजना राबविली गेली. मिळकत कराची थकबाकी जमा हाेण्यासाठी अभय याेजना राबविण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात हाेती. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनीही महापािलकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी अभय याेजना राबविण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला.

मिळकत कराची थकबाकी भरणाऱ्या मिळकतदारांना अभय याेजनेत दंडाच्या रक्कमेत सुमारे ८० टक्के सवलत दिली गेली. मिळकत कर वेळेत न भरणाऱ्यांकडून दंड आकारला जाताे. हा दंड चक्रवाढ पद्धतीने आकारला जात असल्याने थकबाकीचा अाकडा वाढत जाताे. यामुळे मिळकतदार रक्कम भरत नसल्याचा अनुभव आहे.

अभय याेजनेिवषयी मिळकत कर आकारणी आणि संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी माहीती दिली. ‘‘साेमवारी सांयकाळपर्यंत महापािलकेकडे १ लाख १० हजार ११० थकबाकीदारांनी सुमारे ३४१ कोटी रुपये जमा केले आहे. मागील सात दिवसांत २९ हजार ९१६ थकबाकीदारांनी १३२ काेटी रुपये जमा केले आहेत. शेवटच्या दिवशी सुमारे ३५ काेटी रुपयाहून अधिक महसुल जमा झाला आहे. ’’