पुणे विभागातील ३५८  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी  : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

-विभागात कोरोना बाधित १ हजार ९८६ रुग्ण पुणे :पुणेविभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 986 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण

-विभागात कोरोना बाधित १ हजार ९८६ रुग्ण

पुणे  : पुणे विभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 986 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 519 आहेत. आजपर्यंत विभागात कोरोनाबाधीत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 986 बाधित रुग्ण असून 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 783 बाधीत रुग्ण असून आजपर्यंत 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 52 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 106 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 31 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत. 

आजपर्यत विभागात 19 हजार 989 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 19 हजार 96 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 48 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 17 हजार 58 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 986 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये कोरोना पोजिटीव्ह 13 रुग्ण पूर्ण पणे बरे होऊन घरी जाताना सर्व डॉकटर व नर्स व स्टाफ यांचे रुग्णांनी आभार मानले. त्यांना घरी सोडताना सर्व डॉकटर, नर्स व स्टाफ या सर्वांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार, नगरसेवक दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला उपस्थीत होते.