कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींमध्ये ३६ काळजीवाहक

कोरोना बाधीत रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्यास मृतदेहाच्या हाताळणीपासून त्याच्या अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व प्रक्रिया योग्य तो प्रोटोकॉल पाळून करावी लागते. त्यानुसार, मृतदेहाच्या अंत्यविधीकरिता एक हजार शवपिशव्यांची खरेदी करण्यात येणार आहे.

  पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नऊ स्मशानभुमींमध्ये कोरोना मृतदेहांचे पारंपारीक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कामासाठी स्मशानभुमींमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांमार्फत दररोज १२ तासांच्या प्रत्येक शिफ्टमध्ये दोन असे एकूण चार अतिरिक्त काळजीवाहक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासाठी एका कर्मचाऱ्यांवर महिना ३५ हजार रूपये इतका खर्च होणार आहे.

  पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निगडी स्मशानभुमीसह सांगवी, भोसरी, लिंकरोड चिंचवड, नेहरूनगर, मोरवाडी, काळेवाडी, पिंपळे-गुरव, पिंपरीनगर या नऊ स्मशानभुमींमध्ये कोरोना मृतदेहांचे पारंपारीक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या स्मशानभुमींमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या संस्थांमार्फत निविदा अटी-शर्तीनुसार तीन शीफ्टमध्ये प्रत्येकी एक काळजीवाहक नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, कोरोना बाधीत मृतांची संख्या विचारात घेता एक काळजीवाहक मृतदेहाच्या व्यवस्थापनासाठी पुरेसा नाही. त्यामुळे या कामासाठी स्मशानभुमींमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांमार्फत दररोज १२ तासांच्या प्रत्येक शिफ्टमध्ये दोन असे एवूâण चार अतिरिक्त काळजीवाहक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  कामगार विभागाच्या २४ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या अधिसुचनेमध्ये रोजंदारीने काम करणाऱ्या कामगारास किमान दर देण्याची तरतुद आहे. प्रति कर्मचारी ११ हजार ५०० रूपये मूळ वेतन आणि त्यावर विशेष भत्ता म्हणून ५ हजार ७०५ रूपये असा एकूण १७ हजार २०५ रूपये इतका मासिक दर निश्चित करण्यात आला आहे. आठ तासांकरिता प्रति दिन ६६२ रूपये प्रमाणे १२ तासांकरिता प्रति व्यक्ती प्रतिदिन ९९३ रूपये इतका असून प्रति महिना ३५ हजार ७४८ रूपये इतका खर्च कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी होणार आहे.

  एक हजार शवपिशव्यांची खरेदी

  कोरोना बाधीत रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्यास मृतदेहाच्या हाताळणीपासून त्याच्या अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व प्रक्रिया योग्य तो प्रोटोकॉल पाळून करावी लागते. त्यानुसार, मृतदेहाच्या अंत्यविधीकरिता एक हजार शवपिशव्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी साडेतीन लाख रूपये खर्च होणार आहेत. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय हे कोरोना रूग्णांवरील उपचाराकरिता समर्पित करण्यात आले आहे. याशिवाय नवीन भोसरी, नवीन जिजामाता, ऑटोक्लस्टर, जम्बो रूग्णालय आदी विविध ठिकाणी कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा सव्वादोन लाखापार गेला आहे. सध्या रूग्णांचे मृत्युचे प्रमाणही दररोज ७० ते ८० असे आहे.

  यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता यांना शवविच्छेदन विभागाचे शाखाप्रमुख यांनी कोरोना बाधीत रूग्णांच्या मृतदेहांच्या अंत्यविधीकरिता आवश्यक शवपिशवींची मागणी केली होती. या शवपिशवी खरेदी करण्यासाठी अल्प मुदतीच्या निविदा मागविण्यात आल्या. ४ लाख १४ हजार रूपये अंदाजपत्रकीय दर निश्चित करण्यात आला. त्यामध्ये एकूण तीन निविदाधारकांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी ए. आय. डब्ल्यू. एंटरप्रायजेस यांनी प्रति नग ३५८ रूपये ४० पैसे याप्रमाणे एक हजार नग खरेदीसाठी ३ लाख ५८ हजार रूपये असा लघुत्तम दा सादर केला. त्यांचा दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा १३.४२ टक्क्यांनी कमी असल्याने स्विकृत करण्यात आला. या कामाची तातडीची गरज लक्षात घेऊन त्यांना पुरवठा आदेश देण्यात आले आहेत.