लुंकड रियालीटीज विरुद्ध ४० तक्रारी ; व्याजाच्या अमिषाने गुंतवणुकदारांची फसवणूक

पोलिसांकडे तक्रारी वाढू लागल्या आहेत. आजपर्यंत चाळीस तक्रारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या असून, त्याची प्राथमिक चाैकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. साधारणपणे हा फसवणुकीचा आकडा ४० ते ५० काेटी रुपयापर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसाियक संस्था लुंकड रियालीटीज विरुद्ध फसवणुकीच्या तक्रारींविरुद्ध वाढत हाेत आहे. त्यांच्या विरुद्ध पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे ४० अर्ज दाखल झाले आहेत.

    येरवडा पोलीस ठाण्यात संजय हाेनराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी लुंकड रियालीटीजचे संचालक अमित लुंकड यांना गेल्या महीन्यात अटक केली हाेती. त्यानंतर पोलिसांकडे लुंकड रियालीटीजच्या विराेधात तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. बुधवारपर्यंत ४० तक्रार अर्ज दाखल झाले आहे. गुंतवणुकीवर पंधरा टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडले हाेते. हाेनराव यांनी संबंधित संस्थेत २५ लाख रुपयांची गुंतवणुक केली हाेती. त्यापैकी काही रक्कम हाेनराव यांना मिळाली हाेती, उर्वरीत सुमारे सव्वा एकवीस लाख रुपये परत न मिळाल्याने हाेनराव यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीची प्राथमिक चाैकशी करून पोलिसांनी लुंकड यांना अटक केली हाेती. न्यायालयीन काेठडीत रवानगी झाल्यानंतर लुंकड यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला हाेता. न्यायालयात तक्राराचे पैसे परत करण्याची हमी लुंकड यांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने सशर्त जामीन मंजुर केला हाेता.

    यानंतर पोलिसांकडे तक्रारी वाढू लागल्या आहेत. आजपर्यंत चाळीस तक्रारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या असून, त्याची प्राथमिक चाैकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. साधारणपणे हा फसवणुकीचा आकडा ४० ते ५० काेटी रुपयापर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.