४० महिलांची विमानाने सफर ; महिलादिनानिमित्त कवठे येमाईच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांचा पुढाकार

सातत्याने घरगुती वातावरण व कामात व्यस्त असणाऱ्या गावातील ग्रामीण भागातील आपल्या भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा व विमानाचा प्रवास मिळावा म्हणून वैशाली यांनी गावातील महिलांपुढे या उपक्रमाचा प्रस्ताव मांडला.४० महिलांनी विमान प्रवास व हैद्राबाद मधील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देण्याच्या या ४ दिवसांच्या प्रवासाला होकार दिला.

  कवठे येमाई :शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या ४० महिला जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत विमानाने पुणे ते हैद्राबाद अशा ४ दिवसांच्या सहली साठी रवाना झाल्या आहेत. या महिलांना विमानाने प्रवास करण्याची संधी व या उपक्रमाचे नियोजन कवठे येमाई गावच्या नूतन ग्रामपंचायत सदस्या वैशाली दीपक रत्नपारखी यांनी केले आहे.

  सातत्याने घरगुती वातावरण व कामात व्यस्त असणाऱ्या गावातील ग्रामीण भागातील आपल्या भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा व विमानाचा प्रवास मिळावा म्हणून वैशाली यांनी गावातील महिलांपुढे या उपक्रमाचा प्रस्ताव मांडला.४० महिलांनी विमान प्रवास व हैद्राबाद मधील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देण्याच्या या ४ दिवसांच्या प्रवासाला होकार दिला.

  -जगप्रसिद्ध चारमिनारला देणार भेट
  जागतिक महिलादिनी या ४० महिला कवठे येमाई ते पुणे विमानतळ बसने व पुणे ते हैद्राबाद विमानाने प्रवास करीत हैद्राबादला पोहचल्या आहेत. हैद्राबाबद मधील प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी, ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ला,जगप्रसिद्ध चारमिनार, स्नो वल्ड,३ डी शो या व इतर एकूण १५ ते १६ ठिकाणांना या सर्व महिला भेटी देत सहलीचा आनंद लुटणार आहेत. यात रोहिले संगिता, सविता इचके,मिना डांगे,सुभद्रा साडभोर, रंजना नंदा माटे, जाधव, आलका लक्ष्मी ताई, पुष्पा, रूपा साडभोर, संगीता कदम, सुनिता काळे, रंजना कुंभार, दिपाली रत्नपारखी, आश्विन, रेखा, ज्योती, शोभा इचकेव इतर महिला सहभागी झाल्या असून सोमवारी (दि.८) या मराठमोळ्या महिलांनी हैद्राबाद येथे साजऱ्या केलेल्या छोटेखानी महिलादिनाच्या कार्यक्रमात माई माऊली तु, सखी तु, जननी तु, जिजाऊ ची लेक तु, आज दिवस तुझा असे बोलून अरुन्द्ति राहणे, सुवर्णा माने यांनी सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या. ४ दिवसानंतर या सर्व महिला हैद्राबाद ते पुणे असा रेल्वे प्रवास करणार आहेत. एरवी आकाशातून जाणारे विमान व एखाद्या चित्रपटात धावणारी रेल्वे आता यातील अनेक महिलांना प्रथमच असा प्रवास करण्याची संधी मिळणार असल्याने अनेक महिलांनी ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहेत.

  -महिलांना प्रथमच असा प्रवास करण्याची संधी मिळाली
  वैशाली रत्नपारखी यांनी महिला दिनाचे औचित्य साधत केवळ महिलांसाठी या सहलीचे आयोजन केल्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई दिलीपराव वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे,माजी पंचायत समिती सदस्या डॉ. कल्पना सुभाषराव पोकळे,दिपाली बाळासाहेब शेळके, साधना संजय शितोळे,अध्यक्षा साधना महिला नागरी सहकारी पतसंस्था शिरूर,कवठे येमाईच्या सरपंच मंगलताई रामदास सांडभोर, रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या चेअरमन राणी (अश्विनी) कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.