प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

माता बालसंगोपन आणि जन्मजात अर्भके, बालकांसाठी विविध सोयी-सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात आहे. शहरात ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे सव्वातीन लाख आहे.

    पिंपरी: कुपोषण हे केवळ आदिवासी, ग्रामीण भागामध्ये सिमित नाही. तर, स्मार्ट सिटी असणाऱ्या पिंपरी – चिंचवड शहरातही बालमृत्यूंचे भीषण वास्तव समोर आले आहे. उद्योगनगरीत २०१९-२० मध्ये १४३ बालमृत्यु झाले होते. मात्र, हा आकडा २०२०-२१ मध्ये ४१२ वर पोहोचला आहे. कोरोना संकटामुळे गोरगरिब मजुरांचा गेलेला रोजगार, निर्माण झालेली बेकारी, रूग्णालये बंद असल्याने गरोदर माता आणि अर्भकांची उपचाराअभावी झालेली गैरसोय, लसीकरणाचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे बालमृत्युंचे प्रमाण वाढले आहे. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पिंपरी महापालिकेसमोर बालमृत्यु रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

    पिंपरी – चिंचवड महापालिकेची शहरात १० रूग्णालये आहेत. त्यामध्ये ७०० खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाचा समावेश आहे. याशिवाय आठ प्रसुतीगृह, २८ दवाखाने आणि झोपडपट्यांमध्ये २० आरोग्य केंद्रे आहेत. आठ कुटूंब नियोजन केंद्रे तसेच ३८ लसीकरण केंद्रे आहेत. त्यामार्पâत शहरातील रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. तसेच संसर्गजन्य व साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात. राष्ट्रीय आरोग्य तपासणी, पल्स पोलीओ मोहिम, नसबंदी असे राष्ट्रीय कार्यक्रमही आरोग्य यंत्रणेमार्पâत राबवले जातात. त्यामार्पâत साथरोग व इतर संसंर्गजन्य आजारांवर नियंत्रण व त्यांच्या फैलावास प्रतिबंध करणे, महापालिकेच्या आरोग्यविषयक पायाभुत सुविधांचे बळकटीकरण करणे, राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करणे, कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता बालसंगोपन कार्यक्रम राबवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे या बाबींवर भर दिला जातो.

    माता बालसंगोपन आणि जन्मजात अर्भके, बालकांसाठी विविध सोयी-सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात आहे. शहरात ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे सव्वातीन लाख आहे. बालमृत्यूंचे प्रमाण नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात तसे दिसत नाही. २०१९-२० मध्ये १४३ बालकांचा मृत्यु झाला. हाच आकडा २०२०-२१ मध्ये तब्बल ४१२ वर पोहोचला आहे. बालमृत्युचे हे प्रमाण प्रती एक हजार जन्मामागे १७.१ एवढे आहे. कोरोना काळामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, अंगणवाड्यातील रिक्त पदे आणि माता व बालकांमधील कुपोषणामुळे मुलांमध्ये वजन कमी असण्याचे तसेच पुढील टप्प्यात मृत्यू ओढवण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे दिसून येतात. काही वेळेला बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवण्याची वेळ येते. कोरोना संकटामुळे गोरगरिब मजुरांना रोजगाराला मुकावे लागले. त्यामुळे बेकारी निर्माण झाली. कोरोना प्रादूर्भावाच्या पहिल्या टप्प्यात मोठी खासगी रूग्णालयेही बंद होती. याचा परिणाम गरोदर माता आणि अर्भकांवर झाला. उपचाराअभावी त्यांची प्रचंड गैरसोय झाली.

    ''वर्षभरात वाढलेल्या बालमृत्युमागे अनेक कारणे आहेत. कोरोना प्रादूर्भावामुळे महापालिकेचे वायसीएम रूग्णालय कोरोना रूग्णांसाठी समर्पित करण्यात आले होते. शहरातील खासगी रूग्णालयेही बंद होती. त्यामुळे बालकांना तात्काळ उपचार मिळाले नसण्याची शक्यता आहे. त्यातच घरात असल्याने त्वरीत आजार कळून आले नाहीत. कोरोनामुळे झोपडपट्टीतील गोरगरिब कुटूंबांना रोजगारापासून मुकावे लागले. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतर त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध होऊ शकले नाही. अनेक बालकांना कुपोषणाला सामोरे जावे लागले आहे. मातांना गरोदरपणात पोषण आहार न मिळाल्याने कमी वजनाची बाळे जन्माला आली. कित्येक बालकांच्या आजाराचे नेमके निदान होऊ शकले नाही. या काळात अनेक लुप्त झालेल्या आजारांनीही डोके वर काढले. अनेक वर्षानंतर धनुर्वाताचे चार बालरूग्ण वायसीएम रूग्णालयात दाखल झाले. त्यापैकी दोन बालके दगावली. लसीकरणाअभावी गरोदर माता आणि अर्भकांची मोठी गैरसोय झाली.''

    डॉ. दिपाली अंबिके - (बालरोग विभागप्रमुख - वायसीएम रूग्णालय)