Corona-Virus-latest-image

पुणे (Pune) : मिशन बिगिन अंतर्गत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असताना रुग्णसंख्या घटत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. शहरात आज ४१८ नवीन कोरोना बाधित आढळले असून ८६० रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर येथे उपचार घेत असलेल्या महापालिका हद्दीबाहेरील ६ रुग्णांसह २९ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्टीव्ह कोरोना बाधितांची संख्या १० हजारांच्या आत आली आहे.

शहरातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ८५८ इतकी झाली आहे. जूनच्या मध्यावर ऍक्टीव्ह रुग्ण संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडत १८ हजारांपर्यंत झेप घेतली होती. रुग्णांच्या तुलनेत ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटरच्या कमतरतेमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने मरण पावलेल्या रुग्णांची संख्याही वाढली होती. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे होम आयसोलेशन, जंबो कोव्हिड हॉस्पीटल, बाणेर येथील कोव्हिड हॉस्पीटल तसेच महापालिकेच्या व खाजगी रुग्णालयातील ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडस्च्या निर्मितीकरीता प्रशासनाने कंबर कसली होती. या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना सर्वच हॉस्पीटलमध्ये बेडस् उपलब्ध असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख ५७ हजार ५१ झाली आहे. त्यापैकी १ लाख ४३ हजार २२९ जण बरेही झाले आहेत. तर ३ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ऍक्टीव्ह रुग्णांपैकी ८२७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर ४४१ जणांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले आहे.