marriage

तक्रारदार यांनी लग्न करण्यासाठी शादी डॉटकॉमवर नाव नोंदवले होते. यावेळी एका आरोपीने त्यांना संपर्क साधला. त्यांच्याशी ओळख वाढवत त्यांना शादी डॉटकॉमवरील प्रोफाईल आवडले असल्याचे सांगितले. त्याना आपण दुबई येथे नोकरीस असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना दुबईवरून मौल्यवान वस्तू घेऊन भेटण्यास येत आहे, अशी माहिती दिली.

    पुणे : शादी डॉटकॉमवरून ५० वर्षीय महिलेशी ओळख करत लग्न करण्याचे आमिष दाखवून सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ मध्ये घडला आहे.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात मोबाईल धारक व बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी लग्न करण्यासाठी शादी डॉटकॉमवर नाव नोंदवले होते. यावेळी एका आरोपीने त्यांना संपर्क साधला. त्यांच्याशी ओळख वाढवत त्यांना शादी डॉटकॉमवरील प्रोफाईल आवडले असल्याचे सांगितले. त्याना आपण दुबई येथे नोकरीस असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना दुबईवरून मौल्यवान वस्तू घेऊन भेटण्यास येत आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवासी मला दिल्ली विमानतळ येथे कस्टमने अडविले असून, ते मला या वस्तूवर ड्युटी मागत असल्याचे सांगितले. त्याशिवाय ते मला सोडणार नाहीत. अशी भावनिक साधं घालत त्यांच्याकडून वेगवेगळे बँक खात्यावर एकूण साडे चार लाख रुपये घेतले. त्यानंतर ही पैसे मागत असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.