पुण्यात ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

दिवसभरात १हजार ६२७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ

पुणे : कोरोनामुळे बुधवारी शहरात ५६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरात २ हजार ३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी दिवसभरात १हजार ६२७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. आजपर्यंत ९८ हजार ६९५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ८० हजार ८९७ जणांनी कोरोनावर मात केली. बुधवारी १हजार ४०८ रुग्णांनी कोरोना वर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
सध्या विविध रुग्णालयात १०४० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत आणि ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १५हजार ४२३ इतकी आहे.

पुणे विभागातील १ लाख ८० हजार ३४५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ लाख ४४ हजार ४९९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ५७ हजार ६३२ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ६ हजार ५२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६७ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७३.७६ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ७३ हजार ७४७ रुग्णांपैकी १ लाख ३५ हजार ३९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३४ हजार ६३६ आहे. कोरोनाबाधित एकूण ४ हजार ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३४ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ७७.७२ टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १४ हजार ६५७ रुग्णांपैकी ७ हजार ७७६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ६ हजार ४६६ आहे. कोरोनाबाधित एकूण ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १८ हजार ४२६ रुग्णांपैकी १४ हजार ८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार ६५९ आहे. कोरोनाबाधित एकूण ७५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १३ हजार १६२ रुग्णांपैकी ७ हजार ६८६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ४ हजार ९५६ आहे. कोरोनाबाधित एकूण ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण २४ हजार ५०६ रुग्णांपैकी १५ हजार ८३३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार ९१५ आहे. कोरोनाबाधित एकूण ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ६ हजार ५६३ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ३ हजार ४३३, सातारा जिल्ह्यात ६६१, सोलापूर जिल्ह्यात २६२, सांगली जिल्ह्यात १ हजार ३८४ तर कोल्हापूर जिल्ह्यात ८२३ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.