पुण्यात दिवसभरात कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण

मागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या पुणे : शहरामध्ये सोमवारी कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण आढळून आले. मागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या असली तरी

मागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या


पुणे : शहरामध्ये सोमवारी  कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण आढळून आले. मागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या असली तरी रविवारी तुलनेने कमी स्वॅब सॅम्पल्स घेतल्याने नवीन रुग्णांची संख्याही कमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज दिवसभरामध्ये ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. तर तब्बल १६८ रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३९५० वर पोहोचली आहे.

      शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६, ५२९ वर पोहाचली असली तरी आतापर्यत ३९५० रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या २,२५९ इतकी आहे. साधारण ३४ टक्के रुग्ण आजमितीला उपचार घेत आहेत. यापैकी १७४ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी ४६ रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरामध्ये १५९७ संशयितांचे स्वॅब टेस्टिंगसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल येत्या एक दोन दिवसांत अपेक्षित आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यवतीने देण्यात आली.

      शहरात आज कोरोनामुळे ६ जण मृत पावल्याची नोंद झाली आहे. यापैकी एका पुरूषासह दोन महिलांचा मृत्यू रविवारी झाला आहे. हे तिघेही ५८ ते ७६ वर्ष वयोगटातील आहेत. त्यापैकी एकजण मार्केटयार्ड, एकजण कोंढवा आणि एक जण बिबवेवाडी येथील आनंदनगरमध्ये राहाणारा आहे. तर आज मरण पावलेल्यांमध्ये तीनही महिला असून त्या ६० ते ७५ वर्ष वयोगटातील आहेत.  यापैकी येरवडा येथील गांधीनगर आणि दोन पांडवनगर येथील आहेत.