जुगार खेळणाऱ्या ६ जणांना अटक ; इंदापूर पोलिसांची कारवाई

एक काळ्या रंगाचा आयटेल कंपनीचा मोबाईल, दोन सॅमसंग कंपनीचे १६ हजार रूपये किंमतीचे मोबाईल), एक सॅमसंग कंपनीचा नोट ९ हा ३०हजार रुपये किंमतीचा मोबाईल) असा एकूण २ लाख ३१हजार ७५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    इंदापूर : जुगार खेळणा-या व खेळवणा-या सहा जणांवर  कारवाई करत इंदापूर पोलीसांनी दुचाकी व मोबाईलसह २ लाख ३१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुरुवारी (दि.१८) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरातील इजगुडे बिल्डिंग मध्ये ही कारवाई झाली.

    लक्ष्मण दुर्गाण्णा जाधव (वय ४७ वर्षे, रा.बाबा चौक, इंदापूर), अजय संजय चव्हाण (वय २८ वर्ष,रा. कालठण नं १ ता. इंदापूर), नौशाद मुहम्मद मुलाणी (वय ३३ वर्ष, रा.अगोती ता. इंदापूर),नवनाथ सुभाष चव्हाण (वय ३० वर्ष,रा. इंदापूर),बंडु बाबुराव खेत्री (वय ५२ वर्ष, रा.अगोती नं २, ता. इंदापूर), नितीन दत्तात्रय पांढरे (वय ३६ वर्ष, रा.सरस्वतीनगर,इंदापूर) अशी या प्रकरणात गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण १५१ पॉइंटची रम्मी नावाचा जुगार खेळत व खेळवत असताना पोलीसांना आढळले होते.

    त्यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार ॲक्ट ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांकडे  ३,६५० रूपये रोख रक्कम, एक हिरो होंडा पेशन प्लस कंपनी ची मोटारसायकल (नंबर एमएच ४२ एल ८१९३,किंमत साठ हजार रुपये), हिरो होंडा कंपनीची प्लेजर मोटारसायकल (क्र.एमएच ५७७६,किंमत ५० हजार रुपये), होन्डा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र.एमएच ४२ एजे ६७०३,किंमत ७०हजार रुपये), सॅमसंग कंपनी चा  निळ्या रंगाचा एक मोबाईल किंमत ११०० रुपये), एक काळ्या रंगाचा आयटेल कंपनीचा मोबाईल, दोन सॅमसंग कंपनीचे १६ हजार रूपये किंमतीचे मोबाईल), एक सॅमसंग कंपनीचा नोट ९ हा ३०हजार रुपये किंमतीचा मोबाईल) असा एकूण २ लाख ३१हजार ७५०  रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.