जिल्ह्यात आणखी ६ जणांना कोरोनाची लागण

कोरोना बाधितांची संख्या झाली १४७ अहमदनगर: नगर जिल्ह्यात आणखी ०६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री दिसून आले आहे. तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभरात एकूण १६

कोरोना बाधितांची संख्या झाली १४७

अहमदनगर:
नगर जिल्ह्यात आणखी ०६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री दिसून आले आहे. तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभरात एकूण १६ नवीन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई हून निमोन (संगमनेर) येथे आलेले ४० वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित आढळले आहेत. मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे आलेली साठ वर्षीय व्यक्ती बाधित आहे. राहाता तालुक्यात भिमनगर शिर्डी येथील ६० वर्षीय महिला बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.