बारामतीत पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता?, दिवसभरात ६१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

कोरोना बाधितांचा हा आकडा आणखी दिवसेंदिवस वाढल्यास बारामतीत पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीत उपचार घेत असणा-या चौघांचा शुक्रवारी २४ तासांत मृत्यू (Deaths) झाला आहे. बारामतीकरांसाठी ही धोक्याची घंटा (Alert) आहे.

बारामती :  बारामती शहर व तालुक्यात ( Baramati City and District) कोरोनाग्रस्तांचा (Corona Virus) आकडा पुन्हा वाढू लागला असून शुक्रवारी (दि. २७) दिवसभरात ६१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत, कोरोना बाधितांचा हा आकडा आणखी दिवसेंदिवस वाढल्यास बारामतीत पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीत उपचार घेत असणा-या चौघांचा शुक्रवारी २४ तासांत मृत्यू (Deaths) झाला आहे. बारामतीकरांसाठी ही धोक्याची घंटा (Alert) आहे.

बारामती शहर व तालुक्यात दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेल्या कोराना बाधितांच्या संख्येमुळे बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, दिवाळीनंतर कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढू लागली आहे. गुरूवारी (दि. २६) दिवसभरात बारामतीतून ४२ जण कोरोना बाधित आढळले होते, शनिवारी (दि. २८) नव्याने ६१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान बारामती शहर व तालुक्यात बहुतांश नागरीक बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून येत आहे.

विनामास्क फिरणा-यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीदेखील लग्न समारंभात अनेक जण मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. बारामती शहर व तालुक्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता बारामतीत पुन्हा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरीकांनी पुन्हा लॉकडाऊन होवू नये, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांनी सांगितले.