पुणे  शहरातील ६३ टक्के बाधितांची कोरोनावर मात

सक्रिय रुग्णांची संख्या ३२ टक्के पुणे : शहरातील ६३ टक्के कोरोनाबाधित ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण केवळ ३२ टक्के झाले आहे. तर

सक्रिय रुग्णांची संख्या ३२ टक्के  

पुणे : शहरातील ६३ टक्के कोरोनाबाधित ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण केवळ ३२ टक्के झाले आहे. तर काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या ताडीवाला रस्ता, येरवडा, भवानी पेठ या भागातील काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या वाढु लागली अाहे.

स्मार्ट सिटीच्या वॉर रूम कडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार  शहरात आतापर्यंत एकूण ५६ हजार ८०६ जणांच्या स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७ हजार ४४७ जणांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले. या पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ४ हजार ६७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ६३ टक्के आहे.  

शहरात आतापर्यंत ३६९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण ४.९६ टक्के आहे.   सुरूवातीला पुण्यातील कोरोना मृत्यूदर १० टक्क्यांपेक्षाही अधिक होता. तो आता निम्म्यापर्यंत कमी झाला आहे,  शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या २ हजार ४०२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३२.२५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४५ रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शहरात एक लाख लोकसंख्येमागे झालेल्या चाचण्यांचे प्रमाण १ हजार ६७१आहे. पुण्यात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या संशयित रुग्णांच्या तसेच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्तींचेच स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तरी देखील १३.११ टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी पुण्यातील कोरोनाची लढाई पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, वैयक्तिक व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

शहरातील ४२ प्रभागांपैकी सहा प्रभागांत काेराेनाचे अॅक्टीवर रुग्णांचा अाकडा तीन अाकड्यापेंक्षा अधिक असुन, इतर प्रभागांत दाेन अाकडी संख्येने अॅक्टीव रुग्ण अाहेत. सर्वांत जास्त अॅक्टीव रुग्ण असलेले प्रभाग अािण संख्या पुढील प्रमाणे

* काेरेगांव पार्क : २७८

* जनता वसाहत – दत्तवाडी : २२४

* येरवडा : २०२  

* ताडीवाला राेड : १४३  

* डेक्कन िजमखाना – माॅडेल काॅलनी : १२७

* रामटेकडी -सय्यदनगर : १०१