orona

पुणे : पुणे शहरात(pune city) आज नवीन ७०३ कोरोनाबाधित(corona patients) आढळले असून १ हजार ११७ बरे झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील २५ तर पुण्यातील २२ असा ४७ जणांचा मृत्यू झाला.

पुणे : पुणे शहरात(pune city) आज नवीन ७०३ कोरोनाबाधित(703 new corona patients) आढळले असून १ हजार ११७ बरे झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील २५ तर पुण्यातील २२ असा ४७ जणांचा मृत्यू झाला.

पुणे शहरातील ॲक्टीव्ह रुग्णसंख्या १३ हजार ३०० पर्यंत कमी झाली आहे. त्याचवेळी मागील चार दिवसांत अतिदक्षता विभागातील रुग्णसंख्याही ९०० वरून ७७२ पर्यंत कमी झाली आहे. यापैकी ४३७ रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. ऑक्सीजन सपोर्टची गरज असलेली रुग्णसंख्या साडेतीन हजारांवरून २ हजार ३१८ पर्यंत कमी झाली आहे.

पुणे  शहरातील रुग्णसंख्या १ लाख ५३ हजार ६०० झाली असून त्यापैकी १ लाख ३६ हजार ४९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३ हजार ८०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४ हजार २३१ संशयितांची स्वॅब आणि अँटीजेन तपासणी करण्यात आली आहे.