पुण्यात दिवसभरात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,नव्या १०८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुणे : शहरात शनिवारी कोरोनाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. आठ कोरोना बाधितांचा म्रुत्यु झाला असुन, कोरोना मुक्त झालेल्या १९४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

 पुणे : शहरात शनिवारी कोरोनाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. आठ कोरोना बाधितांचा म्रुत्यु झाला असुन, कोरोना मुक्त झालेल्या १९४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

शहरात आजपर्यंत कोरोना बाधितांची एकुण संख्या ६ हजार २०१ झाली आहे. या कोरोना बाधितांपैकी ३ हजार ६४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात कोरोनाचे २ हजार २४८ एक्टिव रुग्ण आहे. आजपर्यंत ३०९ जणांचा म्रुत्यु झाला आहे. सध्या १७३ रुग्णांची प्रक्रुती गंभीर असुन, त्यापैकी ४३ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शनिवारी सुमारे १२०० जणांचे स्वैब नमुने घेण्यात आले आहे. पुणे विभागातील ४ हजार ७९९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ९ हजार ३६४ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण ४ हजार १४०  आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०९रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
 
            यापैकी पुणे जिल्हयातील ७ हजार ४४१ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ४ हजार २०६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २  हजार ९१३ आहे. कोरोनाबाधित एकूण ३२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९५ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
 
            कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ३८३ ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात २४१, सातारा जिल्ह्यात ३०, सोलापूर जिल्ह्यात ४१, सांगली जिल्ह्यात ३ कोल्हापूर जिल्ह्यात ६८ अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 
            सातारा जिल्हयातील ४८२ कोरोना बाधीत रुग्ण असून १४४बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या ३२१आहे. कोरोनाबाधित एकूण १७रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
            सोलापूर जिल्हयातील ८३६कोरोना बाधीत रुग्ण असून ३२१ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.     ॲक्टीव रुग्ण संख्या ४३६आहे. कोरोना बाधित एकूण ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
            सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत १०१ रुग्ण असून ५५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या ४३ आहे. कोरोना बाधित एकूण ३रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
            कोल्हापूर जिल्हयातील ५०४ कोरोना बाधीत  रुग्ण असून ७३बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या ४२७  आहे. कोरोना बाधित एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
            आजपर्यत विभागामध्ये एकुण ८५ हजार ७२३नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   ८० हजार ५२०नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ५ हजार २०३नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ७१ हजार ४१ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ९ हजार ३६४चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.