बारामतीकरांची चिंता वाढली, एकाच दिवसात तब्बल ८० कोरोनाचे रुग्ण

बारामती शहर आणि तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी ८० जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत भर पडलीय. प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू असल्या तरी नागरिकांनी काळजी न घेतल्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवायला सुरुवात केलीय. 

    गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा आकडा कमी होत होता. देशभरातील लॉकडाऊन हटवले जात असताना कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत होती. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचं चित्र निर्माण झालंय. पुणे जिल्ह्यातील बारामती शहर आणि तालुक्यात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वांचीच चिंता वाढलीय.

    बारामती शहर आणि तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी ८० जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत भर पडलीय. प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू असल्या तरी नागरिकांनी काळजी न घेतल्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवायला सुरुवात केलीय.

    बारामती शहर आणि तालुक्यातील सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेत एकूण ३९७ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८० जण कोरोना पॉझीटीव्ह असल्याचं निष्पन्न झालं. यापैकी शहरात ५४ रुग्ण तर ग्रामीण भागात २४ रुग्ण आढळून आले आहेत. शासकीय नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळेच हा आकडा वाढत असल्याचं सांगितलं जातंय.

    नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी होत असून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे यांचा वापर नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून कमी केल्याचं चित्र आहे. एकमेकांपासून अंतर ठेवण्याची प्रक्रियादेखील कमी झाली असून अनेक सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचं चित्र राज्यात जागोजागी दिसत आहे. नागरिकांनी काळजी घेतली नाही, तर पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते.