शेतकरी लक्ष्मण रुपनर व विश्वनाथ खंडाळे
शेतकरी लक्ष्मण रुपनर व विश्वनाथ खंडाळे

मागील तीस दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी माजी सैनिक व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर हे वयाच्या ८० व्या वर्षी शुक्रवारी (१ जानेवारी २०२१) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ते लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

पिंपरी (Pimpari).  मागील तीस दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी माजी सैनिक व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर हे वयाच्या ८० व्या वर्षी शुक्रवारी (१ जानेवारी २०२१) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ते लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

याबाबतचे पत्र त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यांच्या बरोबर पोस्टातील निवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ खंडाळे हे देखील उपोषणात सहभाग घेणार आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. त्याला त्याच्या शेती उत्पादनांचे व श्रमाचे योग्यं मूल्य मिळाले पाहिजे तो त्याचा हक्क आहे. केंद्र सरकारने केलेल्या नवीन शेती कायद्यांमुळे शेती उत्पादनांवर अवलंबून असणारी १८ कोटींहून जास्त कुटूंब बेकारीच्या खाईत लोटली जातील.

अल्प भूधारक शेतकरी बेरोजगारी आणि महागाईमुळे शहरांकडे स्थलांतर करतील. त्यामुळे नागरीकरणामध्ये लक्षणीय वाढ होऊन शहरी भागातील सेवा सुविधांवर अनावश्यक ताण येईल. शहरात झोपड्या वाढतील. गुन्हेगारीत वाढ होईल. कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल. असे अनेक दृश्य व अदृश्य दूरगामी दुष्परीणाम या शेतकरी विरोधी जुलमी कायद्यांमुळे होतील. अशी भिती ज्येष्ठ माजी सैनिक लक्ष्मण रुपनर यांनी व्यक्त केली आहे. नविन जुलमी शेतकरी कायद्यांबाबत केंद्र सरकारने पुर्नविचार करावा या मागणीसाठी उपोषण करीत असल्याचे पत्र रुपनर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.