दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

    इंदापूर : इंदापूर तालुक्यास रस्ते व पूल बांधण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून ८३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    ते म्हणाले की, या निधीतून तालुक्यातील पिंपळे ते शेटफळगढे रस्ता (९ कोटी), कळस ते लाकडी रस्ता (१२ कोटी), कळस येथील बिरोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग ते डाळज नं.२ पर्यंतचा रस्ता (२ कोटी) विठ्ठलवाडी (कळस) ते राष्ट्रीय महामार्गपर्यंतचा रस्ता (२ कोटी),पारेकरवस्ती ते निसर्ग हॉटेल पर्यंतचा रस्ता, कर्मयोगी साखर कारखाना ते इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेजपर्यंतचा रस्ता व इंदापूर बेडशिंगे रोड ते गलांडवाडी नं.२ ते बाभूळगाव पर्यंतच्या रस्त्यासाठी १५ कोटी, भोंगवस्ती ते कर्मयोगी साखर कारखान्यापर्यंतचा रस्ता व कालठण नं.२ ते शिरसोडी ते भीमा नदीपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी रुपये, नीरनिमगाव ते कचरवाडी ते सराटी ते चाकाटी रस्ता व सराटी ते गणेशवाडी रस्त्यासाठी ९ कोटी रुपये, पळसदेव ते न्हावी ते थोरातवाडी ते व्याहाळी रस्त्यासाठी १२ कोटी रुपये, भावडी फाटा ते चांडगाव रस्त्यासाठी ३ कोटी रुपये, रेडा ते शेटफळ हवेली या रस्त्यासाठी ६ कोटी रुपये एवढा निधी देण्यात आला आहे.

    अकोले ते कळस रस्त्यावरील ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी अडीच कोटी रुपये याच रस्त्यावरील मुठा उजव्या कालव्यावर पूल बांधण्यासाठी दीड कोटी रुपये एवढा निधी देण्यात आला आहे. तावशी ते थोरातवाडी रस्त्यावरील दोन ठिकाणच्या ओढ्यांवर पूल बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.