नगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित

कोरोनारूग्णांची संख्या झाली ११२ अहमदनगर: नगरच्या जिल्हा रूग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी सकाळी ६० जणांच्या स्त्राव नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६० पैकी ५१ जणांचे अहवाल

कोरोना रूग्णांची संख्या झाली ११२
अहमदनगर: नगरच्या जिल्हा रूग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी सकाळी ६० जणांच्या स्त्राव नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६० पैकी ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असूुन ९ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४ असे ९ जण करोना बाधित असल्याचे दिसून आले आहे. बाधीत रुग्णामध्ये ४ पुरुष,४ महिला आणि ४ वर्षीय लहान मुलगीयांचा समावेश आहे. निमगाव येथील व्यक्ती यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील. असून आजच्या बाधीत रुग्णांमध्ये वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे. संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालय संगमनेरने तिला जिल्हा रूग्णालयात पाठवले होते. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने पाठवले होते. जिल्हा रुग्णालयात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत्तसेच घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे. चाकण येथून ढोर जळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत असल्याचे आजडच्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे