आंबेगाव तालुक्यातील  ९  गावे कोरोनामुक्त

कोरोनाबाधित १७ जणांवर उपचार सुरू तर ४४ रूग्णांपैकी २६ रूग्णांना घरी सोडले भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील विविध सोळा गावांमध्ये आढळलेल्या ४४ कोरोना बाधित रूग्णांपैकी तब्बल २६ जणांना

कोरोनाबाधित १७ जणांवर उपचार सुरू तर ४४ रूग्णांपैकी २६ रूग्णांना घरी सोडले 

भिमाशंकर :  आंबेगाव तालुक्यातील विविध सोळा गावांमध्ये आढळलेल्या ४४ कोरोना बाधित रूग्णांपैकी तब्बल २६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, एका रूग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला. १७ जणांवर पुणे व मंचर येथील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर ९ गावे कोरोना मुक्त झाली आहेत.    

आंबेगाव तालुक्यात आढळलेल्या ४४ कोरोना बाधित रूग्णांपैकी २२ पुरुष व २१ महिला ६ ते ७४ वर्षे वयोगटातील आहे. साकोरे, जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), एकलहरे, घोडेगाव, मंचर, अवसरी बु., नारोडी, पारगांव व चपटेवाडी या १० गावांमध्ये प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळले. तर शिनोलीमध्ये ४ रूग्ण, निरगुडसर ५, वडगांव काशिंबेग ८, गिरवली ६, वळती २, फदालेवाडी/उगलेवाडी ३ व पेठमध्ये ६ रूग्ण असे १७ गावांमध्ये ४४ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळाले. जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव, एकलहरे, साकोरे प्रत्येकी एक रूग्ण, गिरवली ३ रूग्ण, वळती २, फदालेवाडी / उगलेवाडी मधील ३, वडगाव काशिंबेग ७, शिनोली ४ व पेठ २ रूग्ण असे १० गावांतील २६ कोरोना बाधित रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर नारोडी येथील ६१ वर्षीय रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.      

तालुक्यात विविध ठिकाणी कोरोना रूग्ण आढळल्याने प्रशासनाने १७ गावे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केली. या १७ गावांमधील शिनोली, साकोरे, उगलेवाडी/फदालेवाडी, जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव, एकलहरे व वळती या ८ गावांतील कोरोना बाधित व्यक्ति उपचारानंतर घरी आलेले आहेत. तर नारोडी येथील एका रूग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला, असे ९ गावांमध्ये सदयस्थितीत कोणताही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ति नसल्याने ही गावे कोरोना मुक्त झाली आहेत. वडगांव काशिंबेग, मंचर, अवसरी बु., पारगांव व चपटेवाडी या पाच गावांमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आहेत. तर पेठमध्ये ४ रूग्ण, गिरवली ३ व निरगुडसर ५ रूग्ण असे १७ रुग्णांवर भिमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटल मंचर व पुणे या ठिकाणी उपचार चालू आहे.          

दरम्यान कोरोना बाधित असलेल्या २६ जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना गुलाबपुष्प व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. तहसिलदार रमा जोशी, कोव्हीड सेंटरमधील डॉक्टर, नर्स व विशेषतः आरोग्य सेविका अर्चना निंबाळकर यांनी घरच्या सारखी हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली. तसेच गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, आरोग्य पथकातील कर्मचारी व गावांतील मान्यवरांचे सोडण्यात आलेल्या रूग्णांनी आभार व्यक्त केले.