आंबेगाव तालुक्यात नवीन ९१ रुग्ण कोरोनाबाधित

मंचर :  आंबेगाव तालुक्यात नवीन ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले आहेत. एकुण रुग्णसंख्या ३ हजार ७२ झाली आहे,अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी रविवारी दिली.
पारगांव येथे ३१,मंचर,चांडोली खुर्द,कळंब येथे प्रत्येकी ७,घोडेगांव येथे ६,विठ्ठलवाडी,पेठ येथे प्रत्येकी ४,अवसरी खुर्द,वळती येथे प्रत्येकी ३,वाळुंजनगर,भावडी,शगवे,रांजणी,शिनोली येथे प्रत्येकी २, लाखणगांव, धामणी,नांदुर,लोणी, निघोटवाडी,गोहे बुद्रुक,जारकरवाडी,साकोरे,गिरवली येथे प्रत्येकी १ रुग्ण कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. तीन रुग्णांचा मृत्यु झाला आहे. एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ७२ झाली असुन २ हजार १८३ रुग्ण बरे झाले आहेत. ८०० रुग्णांवर उपचार सुरु असुन आतापर्यंत एकुण ८९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करावे.अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे,घोडेगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.