महाकृषी ऊर्जापर्व अंर्तगत केडगाव उपविभागातील जनमित्र व अधिकारी यांची ९८ किमीची रॅली

महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत केडगाव विभाग व केडगाव उपविभागातील उपविभागातील जनमित्र व अधिकारी यांनी सकाळी ९ पासून सुरू केलेली ९८ किलोमीटर ची भव्य रॅली ची सुरवात केडगाव विभागीय कार्यालापासून बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.

    पारगाव : महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत केडगाव विभाग व केडगाव उपविभागातील उपविभागातील जनमित्र व अधिकारी यांनी सकाळी ९ पासून सुरू केलेली ९८ किलोमीटर ची भव्य रॅली ची सुरवात केडगाव विभागीय कार्यालापासून बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.

    तसेच तत्पूर्वी मुख्य अभियंता पावडे यांनी कृषी योजना २०२० व कृषी पर्व २०२० बाबत उपस्थित जनमित्रांना मार्गदर्शन केले.त्यानंतर सदर रॅली केडगाव बाजार ,दापोडी ,खोपोडी पारगाव,देलवडी ,राहू ,उंडवडी खामगाव,यवत,चौफुला येथील वरवंड येथे रॅली ची सांगता झाली.त्यावेळी केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता एडके,उपकार्यकारी अभियंता मालपे,शाखा अभियंता पिसाळ,करनोर,काकडे,चांदगुडे,चौधरी व सर्व जनमित्र,विभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.