लोणीकरांनो सावधान ! कदम वाकवस्ती येथील ६२ वर्षीय आजोबांसह २ वर्षाच्या नातवालाही कोरोनाची बाधा …

लोणी काळभोर : लोणीकरांनो सावधान ! आळंदी म्हातोबाची येथील कोरोना बाधीत रुग्णांच्या सहा वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड होऊन २४ तासाचा कालावधी उलटण्याच्या आतच, कदमवाकवस्ती येथील ६२

लोणी काळभोर : लोणीकरांनो सावधान !  आळंदी म्हातोबाची येथील कोरोना बाधीत रुग्णांच्या सहा वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड होऊन २४ तासाचा कालावधी उलटण्याच्या आतच, कदमवाकवस्ती येथील ६२ वर्षीय कोरोनाबाधीत आजोबांच्या दोन वर्षीय नातवालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी (ता. २४) निष्पन्न झाले आहे. 

कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील स्वामी विववेकानंद नगरमधील रहिवाशी असलेले एक ६२ वर्षीय आजोबा गुरुवारी (ता. २१) कोरोनाबाधीत असल्याचे आढळुन आले होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या दहा पैकी आठ जणांचे अहवाल रविवारी दुपारी मिळाले आहेत. अहवाल आलेल्या आठपैकी सात जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, रुग्णांचा दोन वर्षीय निरागस नातू मात्र पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 

 लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत मागिल महिनाभराच्या काळात विविध वयोगटातील चौदा कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. चौदा पैकी एका रुग्णाचा अपवाद वगळता, तेरा जणांच्या एकाही जवळच्या नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नव्हते. केवळ कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीमाळवाडी येथील एका रुग्णांच्या दोन नातेवाईकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. चौदापैकी तेरा जणांच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने, आपल्याला कोरोना होणार नाही, अन् झालाच तर आपल्या नातेवाईकांना काही होणार नाही या आवेशाने हवेलीकर फिरत होते. मात्र मागिल चोविस तासात रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या दोन लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता पूर्व हवेलीत भितीचे वातारण पसरले आहे. 

  दरम्यान याबाबत अधिक माहिती देतांना लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी, डॉ. दगडु जाधव म्हणाले, कदमवाकवस्ती येथील स्वामी विवेकानंद नगरमध्ये गुरुवारी एक बासष्ठ वर्षाचा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. या रुग्णाचे दोन मुलगे, दोन सुना व घरातील सहा अशा दहा जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. या दहा जणातील दोन मुलगे वगळता इतर आठ जणांच्या कोरोना टेस्टचे अहवाल रविवारी (ता. २४) दुपारी आले आहेत.

 पूर्व हवेलीत सतरा एप्रिलपासून आत्तापर्यंत चौदा रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध उपाय योजना केलेल्या आहेत. तसेच नागरीकांना कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी सोशन डिस्टन्ससह शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन कऱण्याच्या सुचना वेळोवेळी केल्या आहेत. मात्र, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व लोणी काळभोर ग्रामपंचायतीमधील काही अपवाद वगळता बहुसंख्य नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे.

कदमवाकवस्ती येथे सरपंच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन नागरीकांना आवाहन करुनही, नागरिक मास्क न लावता व सोशल डिस्टन्स न पाळता रस्त्यावर येत आहेत. यामुळे कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत कोरोनाचा उद्रेक झाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी परीस्थिती आहे.