कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ६२५  बेडचे जम्बो रुग्णालय उभे करणार

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात २० ऑगस्टपर्यंत दोन जम्बो रूग्णालय उभारण्यात येणार आहे. पहिली जम्बो फॅसिलिटीज पिंपरी-चिंचवडमध्ये तयार केली जाईल. त्यानंतर  पुढील दहा दिवसात पिंपरी-चिंचवडला ६२५ बेडची जम्बो फॅसिलिटीज रुग्णालय उभारणार असल्याची माहिती विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. 

पिंपरी चिंचवडला ५२५ ऑक्सीजन बेड आणि ६० आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहे. तसेच पुढील तीन दिवसांमध्ये ससून रूग्णालयात ८७० बेड्स रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येतील. या संदर्भात आवश्यक वैद्यकीय कर्मचारी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, राज्यात काल शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे १० हजार ३२० इतके  नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचला आहे.