ट्रम्प झाले तात्या आणि कमला झाल्या आक्का, पुण्यातलं ‘हे’ पोस्टर बघितलंत का?

पुण्यात (Pune)  जो बायडेन (Joe Biden) आणि कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा भला मोठा पोस्टर लावण्यात आला आहे. परंतु हास्यास्पद म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)तात्या झाल्यानंतर, आता जो बायडेन (भाऊ) झाले आहेत, तर कमला हॅरिस (आक्का) झाली आहे.

पुणे : जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तसेच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. बायडेन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांची निवड झाली. त्यामुळे भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच याच गोष्टीचा अभिमान बाळगत पुण्यात (Pune)  जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा भला मोठा पोस्टर लावण्यात आला आहे. परंतु हास्यास्पद म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प तात्या झाल्यानंतर, आता जो बायडेन (भाऊ) झाले आहेत, तर कमला हॅरिस (आक्का) झाली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ समोर कमला हॅरिस आणि भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांचे अभिनंदन करणारा मोठा पोस्टर झळकला आहे. आणि तो जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. ज्या व्यक्तीने हा पोस्टर लावला आहे, त्यांचे नाव पोपटराव खोपडे असे आहे.

या पोस्टरमधून त्यांनी आपल्या पुरोगामित्वाची व स्वदेशाभिमानाची ओळख करून दिली आहे. पोपटराव खोपडे मुळचे भोरचे असले तरी सध्या भारती विद्यापीठ परिसरात स्थायिक आहेत.