मुंबईहून आलेल्या भावाने केले बहिण व भाचीला कोरोनाबाधित

शिक्रापूर औरा सिटीमध्ये आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर येथे अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर नुकताच काही काळ

शिक्रापूर औरा सिटीमध्ये आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ;  सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर


शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर येथे अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर नुकताच काही काळ शिक्रापूरकरांना दिलासा मिळालेला असताना मुंबई हून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला असताना आता सदर इसमाच्या बहिण आणि भाचीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील औरा सिटी या ठिकाणी मुंबईहून एक व्यक्ती त्याच्या बहिणीकडे २७ मे रोजी आलेला होता, त्याला मुंबईहून आलेला असल्यामुळे क्वारंटाईन करण्यात आलेले असताना त्याला काही लक्षणे जाणवू लागल्याने एका खासगी संस्थेमध्ये कोरोना तपासणी केली असता सदर इसम तीन जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्यांनतर सदर इसमाला पुणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून सदर इसमाच्या संपर्कात आलेल्या त्या कोरोना बाधित इसमाच्या बहिणीच्या घरातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले असताना त्याच्या बहिणीला काही त्रास जाणवत होता आणि त्या महिलेला कोरोनाबाबत काही लक्षणे आरोग्य विभागाला आढळून आली असताना आरोग्य विभागाने सदर इसमाच्या बहिणीच्या घरातील चौघांचे स्व्याब तपासणीसाठी पाठविले होते, आज त्या घरातील चौघांचा कोरोना अहवाल प्राप्त झालेला असताना मुंबईहून आलेल्या व्यक्तीच्या बहिण आणि भाचीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर औरा सिटी सोसायटीमध्ये एकाच घरामध्ये तिघांना कोरोनाची बाधा झालेली असल्यामुळे आता नागरिक भयभीत झालेले आहे, तर औरा सिटी सोसायटीमध्ये नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेत आरोग्य विभागाच्या वतीने या सोसायटीमध्ये सर्व्हे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, शिक्रापूर येथील सदर औरा सिटी सोसायटीमध्ये आज पर्यंत ऐकून चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापुर येथील औरा सिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र तर शिक्रापूर पासून पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र सदर प्रकारामुळे शिक्रापूर परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्रापूर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.


बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु

शिक्रापूर ता. शिरूर येथील औरा सिटी सोसायटीमध्ये मुंबईहून आलेला एक इसम कोरोना बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या दोघा बाधितांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबई, पुणे हून आलेल्या व्यक्तींचा मुक्त वावर 

शिरूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मुंबई हून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे समोर आले असताना, शिक्रापूर मध्ये मुंबईहून आलेले एका कुटुंबातील तिघे आणि औरा सिटी सोसायटी मधील मुंबईहून आलेला एक व्यक्ती कोरोन बाधित असताना त्याच्या संपर्कातील दोघे कोरोना बाधित झाले आहे, मात्र आज देखील शिक्रापूर येथे मुंबई पुणे हून आलेल्या इतर व्यक्तींचा परिसरामध्ये मुक्तपणे वावर होत असल्याचे दिऊन येत आहे, मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कदाचित नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.