शिनोलीत मुक्त संचार करणाऱ्या व्यक्तिवर गुन्हा दाखल   प्रदिप पवार यांची माहिती

भिमाशंकर : शिनोली (ता. आंबेगाव) येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने प्रशासनाने हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

 भिमाशंकर : शिनोली (ता. आंबेगाव) येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने प्रशासनाने हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तरीही जिगर बो-हाडे ही व्यक्ति विनाकारण एसटी बसस्थानक परिसरात फिरत असल्याने त्याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिनोली गावात कोरोना बाधित तीन रूग्ण आढळल्याने प्रशासनाने हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले असताना जिगर चंद्रकांत बो-हाडे (वय २७. रा. शिनोली ) गाडी नंबर एम. एच. १४ ई एच ६६७७ ही हुंडाई कंपनीची चार चाकी गाडी घेऊन गाव कॅन्टोन्मेंट झोन माहित असताना तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव आहे याची जाणीव असताना सुध्दा जिल्हाधिकारी पुणे यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून दि. २४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास एसटी बसस्थानक समोर नाकाबंदी करत असताना विनाकारण फिरत होता.

-तर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल    
पोलीसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे विनाकारण फिरून इतरांचे जिवितास धोकादायक असलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य करताना आढळून आल्याने त्याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई शांताराम सांगडे यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युवराज भोजने करत आहे.