आंबेगाव तालुक्यात आढळला एक कोरोना बाधित व्यक्ति ..

भिमाशंकर : चिंचोली (को.) येथील एका व्यक्तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्याने आंबेगाव तालुक्यातील रूग्णांची संख्या ४७ झाली असुन त्यातील ४२ कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. एका रूग्णाचा मृत्यु झाला तर चार व्यक्तिंवर उपचार चालू असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकण्यांची येथील ७५ वर्षीय वृध्दाचा कोरोना रिपोर्ट दि. २० रोजी पॉझिटीव्ह आला आहे. पोलीस प्रशासनाने व ग्रामपंचायत यांनी खबरदारीची उपाय म्हणून गावातील जा-ये करणारे रस्ते बंद केले आहेत. व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यापैकी घरातील सात व इतर १६ व्यक्तिंना क्वॉरंटाइन करण्यात आले असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन, तहसिलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी केेले आहे.
दरम्यान निरगुडसर येथे कोरोनातून बरा झालेल्या एका व्यक्तिचा दि. १९ रोजी मृत्यू झाला आहे. ही व्यक्ति कोरोनातून पुर्ण बरी होऊन घरी आली होती. त्यामुळे त्यांची गणना कोरोना मृत्यू मध्ये करण्यात आलेली नाही, असे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.