रांजणगाव येथे आढळला कोरोनाग्रस्त  रुग्ण

शिरूर तालुक्यात असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीशेजारी कारेगाव येथे एक ८० वर्षीय वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र शिंदे यांनी

शिरूर तालुक्यात असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीशेजारी कारेगाव येथे एक ८० वर्षीय वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितली.शिरूर शहराजवळी कारेगाव येथे रूग्ण अढळल्याने शिरूर शहरासह तालुका हदरला असुन भीतीचे वातावरण पसरले आहे. 

वयोवृद्ध महिलेच्या छातीत दुखत असल्याने शनिवार दि.९ मे २०२० रोजी शिरूर शहराच्या बाह्यमहामार्गाजवळील बाबुरावनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दुस-या दिवशी दि.१० रोजी नगरला ह्रदयरोग तज्ञ यांचेकडे पुढील उपचारसाठी हलवण्यात आले होते.तेथे दि.१३ रोजी कोरोना लक्षणांचा संशय आल्याने पुणे येथे हलवण्यात आले होते.तेथे एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना तपासणी करण्यात आली त्याचा अहवाल दि.१४ रोजी संध्याकाळी कोरोना पाॅझिटिव्ह आला असुन पुणे येथे उपचार सुरू आहेत.महिलेच्या कुटुंबातील १४ जणांना व हाॅस्पिटलच्या १८ जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असुन रिपोर्ट येई पर्यंत हाॅस्पिटल पुढील तीन ते चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे तसेच आरोग्य विभागाच्यावतीने गावात सर्व्हे सुरू आहे.तालुक्यात आत्तापर्यंत ८ रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी सांगितली.

कारेगाव ता.शिरूर जवळ औद्योगिक वसाहत असल्याने येथे अनेक काम करणारे कामगार,मेडिकल कामगार, रहिवासी असल्याने व मोठे गाव असून येथील अनेक लोक गावात खरेदी साठी येत असतात या भागात त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गाव पुर्णतःबंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.संपुर्ण गावात निरजंतुकीकरण औषध फवारणी चालु आहे ती सुरूच राहणार असुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती कारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल नवले यांनी दिली.

"नागरिकांनी घाबरून न जाता संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करावे.अत्यावश्यक कमाशिवाय घराच्या बाहेर न पडता अनावश्यक गर्दी करू नये.स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी थुंकू नका.प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे."

– डाॅ.राजेंद्र शिंदे , शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी