विना मास्क फिरणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला घडवली अद्दल

या ट्विटची दखल घेत पुणे महापालिकेने  वंदना आल्हाट या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ठिकाणी मास्क न वापरल्याच्या कलमाखाली ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे विनामास्क कारवाईच्या नावाखाली नेहमीच पुणेकरांच्या खिसा खाली करणाऱ्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच फटका बसला आहे.

    पुणे: शहरात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बध लागू केले आहे. यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत दंड आकाराला जात आहे. आतापर्यंत विनामास्क कारवाईसाठी पुणेकरांनी तब्बल १३ कोटींच्यावर दंड भरला आहे. मात्र, एका सजग पुणेकराने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्यालाच चांगलीच अद्दल घडवली आहे. नुकतीच वाहतूक शाखेने त्या महिला कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

    पुणे वाहतूक शाखेच्या वंदना संजय आल्हाट या महिला पोलीस कर्मचाऱ्याने विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र यावेळी गंमत म्हणजे दंडाची पावती फाडताना त्यांनी देखील मात्र मास्क परिधान केला नव्हता. स्मितेश रासम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसंगाचा व्हिडिओ तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख,पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे पोलीस, पुणे महापालिका यांना टॅग करत प्रसिद्ध केला होता.