सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्यास ५०० रुपये दंड

प्रदिप पवार  यांची माहिती
भिमाशंकर : कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्क परिधान न करणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तिंवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन संबंधित दंडाची वसूली पोलीस अधिकारी व कर्मचारी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रार्दूभाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून पुणे जिल्हयात जे नागरिक मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी थांबलेले असताना व गाडी चालवत असताना आढळून आल्यास तसेच जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी पान तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्यास किंवा थुंकल्याचे आढळून आल्यास त्या व्यक्तिंकडून ५०० रूपये दंड घेण्यात येणार आहे. संबंधित आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ति, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनिय व नियम अन्वये योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशान्वये सुचित करण्यात आले असल्याचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.