वैद्यकीय सुविधांकरिता पाऊण कोटींचा निधी

निधीपैकी ४५ लाख रुपये व्हेंटिलेटर , वीस लाख रुपयाचे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स , पाच लाख रुपयाचे एक्स-रे मशीन आणि पाच लाख रुपयाचे ईसीजी मशिन इत्यादी वैद्यकीय उपकरणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयाकरिता उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र आज जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पाठविले. पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय सोयी सुविधा रुग्णांना चांगल्या प्रकारे अल्पदरात महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध होण्याकरिता लागणारे साहित्य आमदार निधीतून देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याचे तसेच शहरातील गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले आहे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील रुग्णालयांना वैद्यकीय साहित्य करिता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पूर्वीच २५ लाख रुपये रेमडेसिवीर इंजेक्शन करिता उपलब्ध करून दिले. त्यानंतर आता महानगरपालिका आयुक्त व वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून महानगरपालिकेच्या रुग्णालयांना आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य करीत स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत पाऊण कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

    सदर निधीपैकी ४५ लाख रुपये व्हेंटिलेटर , वीस लाख रुपयाचे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स , पाच लाख रुपयाचे एक्स-रे मशीन आणि पाच लाख रुपयाचे ईसीजी मशिन इत्यादी वैद्यकीय उपकरणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयाकरिता उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र आज जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पाठविले. पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय सोयी सुविधा रुग्णांना चांगल्या प्रकारे अल्पदरात महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध होण्याकरिता लागणारे साहित्य आमदार निधीतून देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याचे तसेच शहरातील गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले आहे.