बारामतीमध्ये दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद ; पावणेतीन लाखाचा माल हस्तगत

मागील काही दिवसापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतून मोटार सायकल चेारीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.त्या अनुंषंगाने पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी मोटार सायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून संशयीत इसम रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने( वय २० वर्षे ,रा.सुर्यनगरी ता.बारामती), ओंकार सुनील चंदनशिवे (वय.२० वर्षे, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली

    बारामती: बारामती शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जर बंद करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून पाच दुचाकीसह दोन लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत ‌केला आहे. यामध्ये ५ मोटार सायकल, ५ अँड्रॉइड मोबाईल फोनसह, २५ हजार रूपये किमतीच्या तांब्याच्या पटटया असा एकुण २लाख ७५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

    याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील काही दिवसापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतून मोटार सायकल चेारीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.त्या अनुंषंगाने पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी मोटार सायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून संशयीत इसम रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने( वय २० वर्षे ,रा.सुर्यनगरी ता.बारामती), ओंकार सुनील चंदनशिवे (वय.२० वर्षे, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली,या चौकशीत त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाणे,बारामती शहर पोलीस ठाणे हददीतून चोरी केलेल्या ५ दुचाकी मोटार सायकल त्यामध्ये होंन्डा शाईन,बजाज पल्सर,दोन स्प्लेन्डर,होन्उा युनिकाॅर्न अशा एकुण 5 मोटार सायकली, ५ वेगवेगळया कंपनीचे अन्ड्राॅइड मोबाईल फोन, तांब्याच्या पट्ट्या असा एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

    सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शंशिकांत दळवी,होमगार्ड सिघ्दार्थ टिंगरे,ओंकार जाधव यांनी केली आहे.