प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

प्रियकराने दुसऱ्याच मुलीशी विवाह केल्यानंतर प्रियसीने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला.

    पुणे : प्रियकराने दुसऱ्याच मुलीशी विवाह केल्यानंतर प्रियसीने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. तर, प्रियकराच्या आई-वडिलांना हे माहित असतानाही त्यांनी या तरूणीला त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.

    मनीषा गोविंद गायकवाड (वय २२, रा. फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर नितीन दत्तात्रय गायकवाड (वय २३, रा. पानमळा, हडपसर) याला अटक केली. तर, त्याच्या आई-वडिलांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मनिषा हिचे वडिल गोविंद (वय ६०) यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा व नितीन यांच्यात प्रेम संबंध होते. पण, त्याने मनीषा यांच्या परस्पर दुसऱ्याच मुलीशी विवाह केला होता. ही बाब मनीषाला समजली होती. त्यामुळे तिने तू माझी फसवणूक केली, असे म्हणत नितीनशी वाद घातला.

    दरम्यान, या दोघांच्या प्रेम संबंधाबाबत नितीन याच्या आई-वडिलांना माहिती होते. पण, त्यांनी फिर्यादी यांना सांगितले नाही. तसेच, नितीन व त्याच्या आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून मनीषा हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे करत आहेत.