पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ )
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ )

कोरोना संकटाच्या काळात थिएटरमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट महोत्सवाला मुकलेल्या साहित्य आणि सांस्कृतिक प्रेमींसाठी आनंदवार्ता आहे. यंदा पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) 4 मार्च ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. प्रेक्षकांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही स्वरूपात हा कार्यक्रम पाहता येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पिफ महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर अलीकडेच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

पुणे (Pune). कोरोना संकटाच्या काळात थिएटरमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट महोत्सवाला मुकलेल्या साहित्य आणि सांस्कृतिक प्रेमींसाठी आनंदवार्ता आहे. यंदा पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) 4 मार्च ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. प्रेक्षकांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही स्वरूपात हा कार्यक्रम पाहता येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पिफ महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर अलीकडेच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

पुणे चित्रपट महोत्सव याआधी 14 ते 21 जानेवारी 2021 दरम्यान जाहीर करण्यात आला होता. मात्र गोव्यात ईफ्फी हा महोत्सव 16 ते 21 जानेवारी दरम्यान होत असल्याने एकाच वेळी दोन्ही महोत्सव आल्याने पिफच्या आयोजनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता आज झालेल्या पत्रकार परिषदेत जब्बार पटेल यांनी पिफच्या अधिकृत तारखांची घोषणा केली आहे. हा महोत्सव येत्या ४ मार्च ते ११ मार्च या दरम्यान होणार असून त्यात जवळपास १५० चित्रपटांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. हा महोत्सव ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात रसिकांना अनुभवता येणार आहे. पटेल म्हणाले, यावर्षी महोत्सवाचा विस्तार करून आणखी एक शहराचा करण्यात आला आहे. त्या शहराचे नाव लातूर आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री लातूरचे आहेत त्यामुळे हे शहराची यंदा भर घालण्यात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुण्यानंतर मुंबई, नागपूर आणि लातूर मध्ये महोत्सव होणार आहे. लातूरमध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महोत्सव होणार आहे

पुण्यात डिसेंबर – जानेवारी महिना हा विविध सांस्कृतिक महोत्सवांचा सुवर्ण काळ असतो. सांगीतिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या पर्वणीमुळे शहरातील वातावरण कलात्मक होऊन जाते. परंतु यंदा महोत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने चित्रपट महोत्सव ‘ऑनलाइन’ की ‘ऑफलाइन’ होणार याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता होती.