हापूस आंबा उत्पादकांकडून थेट खरेदीची सुवर्णसंधी

पुणे : कोकणातील हापूस आंब्याचा आकर्षक रंग, अवीट गोड चव, मोहक रसरशीत मऊगर व मनमोहक सुवास अशी ऐकाहुन एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत.

 खरेदीदारानी कृषी पणन मंडळाचे संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक

पुणे : कोकणातील हापूस आंब्याचा आकर्षक रंग, अवीट गोड चव, मोहक रसरशीत मऊगर व मनमोहक सुवास अशी ऐकाहुन एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत. असा हा हापूस आंबा महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील खवय्यांची रसना तृप्त करतो. त्यामुळे ग्राहक आतुरतेने हापूस आंब्याची वाट पहात असतात. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकांव्दारे उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. तथापि यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर आंबा महोत्सव आयोजन करणे अशक्य आहे. कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी  शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांना ही घरा बाहेर किंवा सोसायटी बाहेर पडावे लागू नये या करिता उत्पादक ते ग्राहक या दोघांनीही ऑनलाइन पोर्टलव्दारे आंबा खरेदी- विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील Buyer Seller Information लींक व्दारे खरेदीदाराना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.