संजय गांधी निराधार योजनेतील बारामतीतील लाभार्थ्यांना अडीच कोटीचे अनुदान ; लॉकडाऊन मुळे एप्रिल व मे दोन महिन्याचे अनुदान जमा

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदीरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदीरा गांधी विधवा योजना व इंदीरा गांधी अपंग योजनेतील सर्व पात्र व मंजूर असलेल्या बारामती तालुक्यातील ११,९३८ लाभार्थींना एप्रिल व मे २०२१ या २ महिन्यांचे व श्रावण बाळ योजनेचे राहिलेल्या मार्च महिन्यासह सर्व एकत्रित अनुदान उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कोविड -१९ लॉकडाऊन मदत म्हणून एकूण दोन कोटी ३१ लाख ७७ हजार १००रुपयांचे अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती सह,बँकेच्या बारामती तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये संजय गांधी निराधार योजना शाखा तहसीलदार बारामती यांच्या कार्यालयाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे.

    बारामती: बारामती तालुका व शहरातील सर्व संजय गांधी योजनेसह अन्य योजनेतील ११ ,९३८ लाभार्थ्यांना २ कोटी ३१ लाख ७६ हजार १०० रुपये एवढे एप्रिल व मे या दोन महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांनी दिली . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार लॉक डाऊन मदत म्हणून सदर अनुदान जमा करण्याच्या सूचना दिल्यामुळे सदर अनुदान प्रशासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

    संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदीरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदीरा गांधी विधवा योजना व इंदीरा गांधी अपंग योजनेतील सर्व पात्र व मंजूर असलेल्या बारामती तालुक्यातील ११,९३८ लाभार्थींना एप्रिल व मे २०२१ या २ महिन्यांचे व श्रावण बाळ योजनेचे राहिलेल्या मार्च महिन्यासह सर्व एकत्रित अनुदान उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कोविड -१९ लॉकडाऊन मदत म्हणून एकूण दोन कोटी ३१ लाख ७७ हजार १००रुपयांचे अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती सह,बँकेच्या बारामती तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये संजय गांधी निराधार योजना शाखा तहसीलदार बारामती यांच्या कार्यालयाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे.

    तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासंबंधी आपआपल्या गावातील व वार्डमधील लाभार्थींना याची कल्पना देऊन त्यांना अनुदान मिळणेसाठी सहकार्य व मदत करावी ही असे आवाहन धनवान वदक यांनी केले आहे.