कुरकुंभ येथील केमिकल कंपनीला भीषण आग

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. घटनास्थळी

 कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ  एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीचे स्वरुप इतके भीषण आहे की तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला ही आग शुक्रवारी(दि. २२) सकाळी सकाळी साडेदहाच्या सुमारास लागली आहे.मिथेनॉल,आय पी ये ,कॉस्टिक अश्या विविध प्रकारच्या रसायनाच्या प्रक्रीया केल्या जात होत्या. आग लागली त्या वेळेस अंदाजे पाचशे रासायनिक मोठे ड्रम आतमध्ये होते, अशी माहिती समोर येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कंपनीचे मोठे नुकसान या आगीत झाल्याचे समोर येत आहे. 

या कंपनीत आगीचे व धुराचे  लोट चे लोट दिसत असल्याने या परिसरातील नागरिक व एमआयडीसीत असणाऱ्या  कंपन्यांतील कामगार भयभीत झाले होते. यावेळी कंपनीत आग लागल्याने १० ते १५ किलोमीटर पर्यंत  धुराचे लोट ची लोट  दिसत होते. तब्बल तीन तासांनी या आगीला आटोक्यात आणण्यात कुरकुंभ अग्निशमन दलाचे जवानांना यश आले. कुरकुंभ एमआयडीसी मध्ये  एका कंपनीत आग लागल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. परंतु घटनास्थळी पोलीस उपस्थित झाल्याने पोलिसांनी नागरिकांना सांगितले की अफवांवर विश्वास ठेवू नका आग आटोक्यात आल्याचे पोलिसांनी नागरिकांना सांगितले

आग आटोक्यात आणण्यासाठी  अग्निशमन दल कुरकुंभ, आयपीएस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, प्रांताधिकार प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, यांनी आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला मदत केली . ही आग विझवण्याचे कुरकुंभ अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर खांडेकर व यांची टीम  ऑनर लॅब कंपनीचा बंब  तसेच दौंड नगरपालिका,  पुणे महानगर अग्निशमन सेवा, पुरंदर-सासवड नगर पालिका , नीरा , इंदापूर , जेजुरी, बारामती  असे आठ ते दहा  बंब कार्यरत होते तसेच आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य म्हणून  कारगील  कंपनीचे एच आर व्यवस्थापक ललित घोडके यांनी व यांच्या टीम ने  तसेच ग्रामपंचायत सदस्य विनोद शितोळे , संदीप कोथिंबीरे , प्रीतम मोरे, यांनी कुसुम कंपनीला लागलेल्या आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सदर  घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी घटनेची पाहणी केली.

"कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक  रासायनिक कंपन्या असून काही कंपन्या अतिशय घातक स्वरूपाचे रसायन तयार करतात किंवा त्यांच्या वापरासाठी आणतात मात्र त्या रसायनासाठी आवश्यक असणारी सुरक्षा यंत्रणा त्यांच्याकडे नसते किंवा अशी यंत्रणा बसविण्याचे कंपनी टाळते, त्यामुळे बऱ्याच वेळा या एमआयडीसी मध्ये स्फोट होतात,या अगोदर देखील स्फोट झालेल्या कंपन्यांवर बोगस कारवाई केल्या जातात,यामुळे अशा कंपन्यावर कठोरातील कठोर कडक कारवाई करावी, यासाठी कुरकुंभ उपअभियंता यांना ग्रामपंचायतने  लेखी पत्रव्यवहार केला आहे."

           -राहुल भोसले, सरपंच,  कुरकुंभ