पुण्यातील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग; एका कामगाराचा मृत्यू

आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले गंज पेठ येथील मासेआळी कॉर्नर जवळ 'आर. के. स्क्रॅप सेंटर आहे. हे स्क्रॅप सेंटर रोहित वासुदेव कुदाराम यांचे आहे. पुढच्या बाजूला छोटे दुकान आहे. तर पाठीमागे ४०० स्केअरफूटमध्ये गोडाऊन आहे.

    पुणे : पुण्यातील गंज पेठेत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागलेल्या आगीत आत झोपलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले गंज पेठ येथील मासेआळी कॉर्नर जवळ ‘आर. के. स्क्रॅप सेंटर आहे. हे स्क्रॅप सेंटर रोहित वासुदेव कुदाराम यांचे आहे. पुढच्या बाजूला छोटे दुकान आहे. तर पाठीमागे ४०० स्केअरफूटमध्ये गोडाऊन आहे.

    दरम्यान, प्लास्टिक आणि तेलाचे डब्बे विकत घेण्याचे काम केले जात होते. दरम्यान, गुरुवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अचानक नागरिकांना कामगाराचा ओरडण्याचा आवाज आला. तो ओरडला त्यावेळी आग नव्हती, असे नागरिकांनी अग्निशमन दलाला सांगितले. पण नंतर काही वेळातच आग लागल्याचे दिसून आले. मग त्यांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानंतर मध्यवर्ती अग्निशमन दलाचे जवान फायर बंब घेऊन दाखल झाले.

    ५ ते १० मिनिटात ही आग आटोक्यात आणली. पण आत जाऊन पाहिल्यानंतर एक कामगार आगीत होरपळल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु दुर्देवीपणे त्याचा मृत्यू झाला. तसेच याप्रकरणी आता पुढील चौकशी करण्यात येत आहे.